धक्कादायक! सुशांतसिंग रजपूतच्या नंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याची आत्महत्या; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका
मुंबई| मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आपल्या जीवनाला कंटाळले आहेत. त्यामुळे अनेक तरुण पिढी या जगाचा निरोप घेताना दिसत आहे. तरुण मुलं मुली हे या भारताचे होतकरू नागरिक आहेत. मात्र आयुष्यात आलेल्या थोड्या नैराश्याला घाबरून आणि त्रस्त होऊन अनेक कलाकार मंडळी आपले जीवन संपवत आहेत.
कलाकार आपल्या आयुष्याला अशा पद्धतीने का कंटाळत आहेत. याचा अनेक नेटकरी शोध घेत आहेत. अशात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखं आणि दुःख येतच असते. मात्र त्याला न भिता आयुष्यात त्याच्यापासून पळ काढण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. मात्र अनेक व्यक्ती यातून पळ काढतात आणि आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात.
साऊथ इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्याने असेच टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सगळीकडे दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार अशा पद्धतीने स्वतःचे जीवन संपवत आहेत. त्यामुळे या कलाकारांना फक्त आणि फक्त योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे अनेक जण म्हणत आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने देखील अशाच पद्धतीने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नाही. अशात त्याचे निधन झाले त्यावेळी अनेकांनी बॉयकॉट बॉलिवुड हा नारा दिला होता. आता पुन्हा एकदा असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण साउथ इंडस्ट्री मधील एका तरुण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केली आहे.
सरथ चंद्रन असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी विश पिऊन आत्महत्या केली आहे. त्याने आतम्हत्या केल्यावर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याचे शव ताब्यात घेतले आहे. तसेच पोस्टमार्टमला पाठवले. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार पोलिसांनी त्याने विश पिऊन आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.
आता त्याचे हे असे वागणे अनेकांच्या काळजाला चटका लावणारे आहे. त्याने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहते खूप हळहळ व्यक्त करत आहेत. अंगमली डायरीज या चित्रपटात अभिनय करून त्याने खूप प्रसिध्दी मिळवली. या चित्रपटात अभिनय करून तो घराघरात पोहोचला. त्यामुळे सगळीकडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.
त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक चित्रपट मालिका तसेच जाहिरातींसाठी काम केले. त्याच्या निधनानंतर पोलिसांना त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की, “मी माझ्या इच्छेने हे पाऊल उचलत आहे, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.” मात्र पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. तसेच त्याने प्रेम प्रकरणातून हे पाऊल उचलले आल्याचा पोलिसांना संशय आहे.