Shokking! 66 वर्षीय आजोबांनी 28 वर्षांनी लहान असलेल्या तरुणी सोबत थाटला संसार; करत आहेत हनिमूनला जाण्याची तयारी

मुंबई | भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी त्यांच्या पेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या एका मुली सोबत लग्न केले. त्यामुळे ते भलतेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांच्या या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती.
अरुण लाल यांचे सध्याचे वय ६६ वर्ष आहे. त्यांनी बुलबुल सोबत काहीच दिवसांपूर्वी संसार थाटला आहे. सध्या ते हनिमूनला जाण्याची तयारी करत आहेत. बंगाल रणजी संघाचे ते कोचिंग करत होते. मात्र अचानक त्यांनी त्याचा राजीनामा दिल्याने क्रिकेटविश्वास खळबळ उडाली होती.
मात्र मी हा राजीनामा स्वईछेने देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कोच पदाचा कायमचा राजीनामा दिला आहे. सध्या ते त्यांच्या हनिमून ट्रीप मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले आहेत. अनेकांना ते हनिमून साठी कोणता स्पॉट निवडतात याची उत्सुकता लागली होती.
अरुण लाल हे त्यांच्या पत्नी बुलबुलला घेऊन टर्कीला हनिमून साठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचं पहिलं एक लग्न झालं आहे. मात्र पहिली पत्नी आजारी असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नीच्या इच्छेनुसार त्यांनी हे दुसरं लग्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे.