कलाविश्वात शोककळा! पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या दिग्गज कलाकाराचे निधन

पुणे | गेल्या काही दिवसांपासून अभिनय आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन होताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर, बप्पी लहिरी, रमेश देव यांच्या सारख्या दिग्गजांचे निधन झाले आहे. त्यामुळे कला विश्वात प्रचंड अस्तिरता निर्माण झाली आहे.

 

यांच्या निधनाची बातमी ताजी असताना भारतीय संगीत क्षेत्राला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पद्मविभूषण शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

संतूर वाद्याला जागतिक दर्जा देण्यासाठी पंडित शिवकुमार शर्मा यांचा सर्वाधिक हात आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वच वर्ष ही संगीत क्षेत्रातील लोकांची सेवा करण्यासाठी घालवली आहेत. ते एक चांगले संगीतकार म्हणून देखील ओळखले जायचे.

 

त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारत देशाचे संगीत क्षेत्रातील मानबिंदू म्हणून त्यांना ओळखले जातं होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला एक पोकळी निर्माण झाली आहे.

 

त्यांना सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित केले होते. देशाचं नाव संगीत क्षेत्रांत उंचावर नेहूंन ठेवण्यात शिवकुमार यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची पोकळी भरून निघणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button