चित्रपट सृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; देशात शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने पूर्ण जगात शोककळा पसरली होती. त्यानंतर हिंदी दिग्गज अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने देखील सर्वच हादरले होते.

 

यांच्या सोबतच बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले होते त्यामुळे 2022 सालात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका प्रसिध्द अभिनेत्याचे निधन झाले आहे.

 

त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अभिनेते आणि पटकथा लेखक शिव कुमार सुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. मृत्यू वेळी त्यांचे वय 86 वर्ष होते. ते एक चांगले पटकथा लेखन म्हणून देखील ओळखले जायचे.

 

त्यांनी शेकडो चित्रपटांत भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांच्या स्टोऱ्या देखील लिहल्या आहेत. त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. मुक्ती बंधन, हजारो ख्वाईशे ऐसी, बंगिस्तान, परिंदा अशा प्रसिध्द चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.

 

त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. लाखोंच्या संख्येत असलेल्या चाहत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधार आला नाही.

 

आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या निधनावर अनेक दिग्गज लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button