Shetkari Yojana: आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार स्वतंत्र डीपी; लगेच करा अर्ज

Farmer Yojana | शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे शेतातील पंपासाठी लागणारी वीज, कारण स्वंतत्र ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. शेतातील वीज पूर्ण दाबाने येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Ek Shetkari Ek Dp yojana)

सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये स्वतंत्र डिपी नसल्यामुळे शेतकऱ्यांना सामायिक डीपी मधून कनेक्शन घ्यावं लागतं आहे. आणि याच मुळे एका ट्रान्सफॉर्मर वर जास्त कनेक्शन झाल्यामुळे लोड येत आहे. आणि शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज मिळत आहे. यामुळे शेतातील पंप तसेच स्टार्टरचे नुकसान होत आहे. याच मुळे सरकारने ही योजना आणली आहे. (Ek Shetkari Ek Dp yojana online Application)

आत्तापर्यंत या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याबाबत माहिती सांगणार आहोत. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती मिळणार आहे.

Advertisement

या कागदपत्राची करावी लागणार पूर्तता

    1. आधार कार्ड
    2.  शेतीचा 7/12 उतारा
    3.  दूरध्वनी क्रमांक
    4.  जातीचे प्रमाणपत्र
    5. बँक खात्याची माहिती

असा करा अर्ज

Advertisement
 1. https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index_mr.php ही वेबसाईट ओपन करा.
 2. त्यानंतर तुम्ही या वेबसाइटच्या HomePage वर जाल, त्याठिकाणी ग्राहक पोर्टल वर जा आणि ‘नवीन कनेक्शन अर्ज’ असलेल्या बटणावर क्लिक करा.
 3. त्यानंतर Agriculture या बटणावर क्लिक करा.
 4. त्यानंतर हॉर्स पावर वर क्लिक करा. आणि बॉक्सवर क्लिक करुन Submit करा.
 5. त्यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल, त्यावर माहिती भरा. आणि सबमिट वर क्लिक करा.
 6. त्यानंतर मेलआयडी आणि मोबाईल नंबर टाका, तसेच इतर लागणारी कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.
 7. आणि शेवटी जी रक्कम दिली आहे. ती भरा आणि पावती डाऊनलोड करून ठेवा.

 

हेल्पलाईन नंबर (Helpline Number) –
तुम्हाला जर या योजने बाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील हेल्पलाईन क्रमांकावर जाऊन तुम्ही तुमच्या ज्या पण शंका असतील त्या विचारू शकता. आणि मदत मिळवू शकता.

येथे क्लिक करुन करा ऑनलाईन अर्ज

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *