Shetkari Yojana: शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळतंय 3 लाख रुपयांचे कर्ज; लगेच करा अर्ज

Shetkari Loan Yojana | कर्ज म्हणलं की प्रत्येकाला त्याची आवश्यकता पडते. मात्र अनेकांना कर्ज घेणं खूप अवघड वाटत. आणि भीतीने शेतकरी बँकेतून कर्ज घेत नाही. खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन बुडीत जातो. मात्र तेच कर्ज अल्प व्याजदरात बँकांकडे उपलब्ध असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत. (Kisan Credit Card Loan 2022)

Join WhatsApp Group

 

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला तब्बल ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. आणि त्यासाठी कागदपत्रे देखील जास्त लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचा आणि अर्ज करा. सरकार प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड देते. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

 

त्यासाठी प्रथम शेतकरी हा पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या योजनेशी निगडित असाल तर लगेच तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या कार्ड वरून ३ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आणि हे कर्क अत्यंत अल्प व्याजदरात उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही लगेच या योजनेचा फायदा घेऊ शकता. (kisan Credit Card karj 2022)

 

आवश्यक कागदपत्रे – 7/12 उतारा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (बँका त्यांच्या गरजेनुसार अजून कागदपत्रांची मागणी करु शकतात.)

 

या बँकेत करा अर्ज – स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), बँक ऑफ इंडिया (Bank of India), ॲक्सिस बँक (Axis Bank), नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National payment Corporation of India)

 

असा करा अर्ज – जर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जावा. किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जा, आणि त्यानंतर kisan Credit Card Apply असे एक बटण दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज करा. मागितलेली कागदपत्रे व्यवस्थित भरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button