Shetkari Karj Mafi 2026 | महाराष्ट्र राज्यातील ३ लाखापर्यंत थकीत कर्जदारांच्या माफीची घोषणा पुढील काही दिवसात होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे . जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाले आहेत, आणि बँकांकडून घेतलेले कर्ज नियमित भरू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांचे कर्ज शासन भरणार आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात या कर्ज माफीची घोषणा कोणत्याही क्षणी केली जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारी नुसार प्रत्येक वर्षी राज्यातील ७ शेतकरी दरवर्षी आत्महत्या करत आहेत. शेतातील पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस विविध रोगांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिक पिकले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. Maharashtra farmer loan waiver 2026
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील थकीत कर्जाची मूळ आकडेवारी राज्य शासनाने रिझर्व्ह बॅंकेला मागितली होती. रिझर्व्ह बॅंकेने त्यांच्या अधोरिक्या खाली चालणाऱ्या बँकांना आकडेवारी देण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यांनंतर राज्यातील पिक कर्ज वाटप केलेल्या अनेक बँकांनी रिझर्व बँकेकडे आकडेवारी दिल्याचे सांगितले जात आहे. याचा फायदा थकीत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 3 lakh crop loan waiver Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ३६ हजार कोटी रुपये कर्ज थकले आहे. शेतातील पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. हमीभाव जाहीर होत नाही. तसेच इतर नैसर्गिक गोष्टींमुळे राज्यातील हजारो शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. घेतलेले कर्ज वेळेवर भरू म्हणणारे शेतकरी अडचणीत आल्यामुळे हे कर्ज थकीत आहे. बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे तगादा लावला आहे. शेतकऱ्यांनी मिळून आपल्या स्थानिक प्रतिनिधींकडे कर्ज माफीसाठी शासनाकडे पाठपुरावा करा. अशी मागणी केली.
त्यांनंतर युती सरकार मधील आणि विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधीनी शासनाला घेरल्याच्या काही बातम्या आपण पाहिल्या, सध्या राज्य सरकार अडचणीत आहे. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकार अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिन्याला १५०० रुपये प्रत्येक पात्र महिलेला देण्यात येतात. त्यामुळे राज्य सरकार अडचणीचा सामना करत आहे.
तरी देखील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी शासन मोठ पाऊल उचलत असल्याने शेतकऱ्यांनी राज्य शासनाला शब्बासकी देण्यास सुरुवात केली आहे. माजी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती गठीत केली आहे. थकीत कर्जदारांची माहिती शासनाकडे सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत, ही समिती गठीत केलेली माहिती लवकरच शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगीतल जातय.
त्यापूर्वी शासन कर्जमाफीसाठी घोषणा करणार असण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारने फक्त अनियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा दिला आहे. ५० हजारांपासून ते १ लाख रुपये अनुदान देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. फक्त मागील ५ वर्षात नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच याचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य शासन सरसकट कर्ज माफी करण्याच्या विचारात होते. मात्र शासनाचे बजेट कोलमडल्यामुळे फक्त थकीत कर्जदारांना या कर्ज माफीचा फायदा होणार आहे. कर्ज थकीत असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना परत दुसरे पिक लावण्यासाठी बँका कर्ज देत नाहीत. यामुळे लाखो शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. जून कर्ज थकल्यामुळे प्रायव्हेट बँक देखील शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी नकार देत आहेत.
ही कर्जमाफी नेमकी कशी असेल? (Shetkari Karj Mafi 2026)
जे शेतकरी थकीत आहेत, यांच्यासाठी या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या कर्जमाफीतून फक्त ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज शासन माफ करण्याच्या तयारीत आहे. ज्याचे कर्ज ३ लाखांपेक्षा जास्त आहे. अशा शेतकऱ्यांना उर्वरित कर्ज फेडण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो. उर्वरीत कर्ज थकीत न ठेवता ते चांगल्या स्थितीत आणून ठेवावे लागू शकते. त्याच बरोबर जे शेतकरी घेतलेले कर्ज नियमित भरत आहेत. Maharashtra crop loan waiver update
अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजारांपासून ते १ लाखांपर्यंत अनुदान शासन देणार आसल्याची माहिती आहे. मात्र हे अनुदान कर्ज मंजुरीच्या आकडेवर ठरविले जाणार आहे. कर्ज माफीचा आदेश पारित केल्या नंतर अनुदानाची निच्छित आकडेवारी समोर येईल. या सोबत शेतकऱ्यांसाठी विविध योजनांमध्ये बदल आणि नवीन योजना शासन जाहीर करू शकते. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या बारकाईने समित्यांमार्फत ऐकून घेतल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नाने या कर्जमाफीचा आदेश जाहीर केला जाणार आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या सुवी सुविधा आणि महा डीबीटी वरील योजनांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कर्जमाफीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ
कर्जमाफीची घोषणा करण्यात आली का?
उत्तर – कर्जमाफीची घोषणा आणखी झाली नाही मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा होऊ शकते.
या माफीचा लाभ कोणाला होऊ शकतो?
उत्तर – शासन निर्णय झाल्यानंतर स्पष्ट होईल पण ज्या शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल का?
उत्तर – नाही पण त्यांच्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाऊ शकते.
या पाठीमागे झालेल्या कर्जमाफी बद्दल माहिती सांगा?
उत्तर – २०१७ – छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना (१.५ लाखापर्यंचे कर्ज माफ), २०१९ – महात्मा फुले कर्जमुक्ती योजना (२ लाखापर्यंचे कर्ज माफ)
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
उत्तर – कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सरकार ऑनलाइन पोर्टल देईल किंवा बँकेच्या पोर्टल मधून अर्ज करण्याची सुविधा दिली जाईल.
या कर्जमाफीमध्ये कोणत्या कोणत्या बँकेतील कर्ज माफ होईल?
उत्तर – सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्ज माफ केले जाऊ शकते.
कर्जमाफीची अधिकृत माहिती कोठे तपासावी?
उत्तर – कृषी विभाग किंवा राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टल वर याची माहिती जाहीर केली जाऊ शकते.
| Official Website Government | Visit Now |
| Agriculture Department | Visit Now |
टिप – कर्जमाफीची आणखी अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा होऊ शकते. आम्ही दिलेली माहिती ही सूत्रांच्या माहितीवरून दिली आहे. घोषणा झाल्यानंतर आदेशाची प्रत व्यवस्थित वाचून अर्ज करावा. 3 lakh farm loan waiver news





