Sheli Palan Anudan: शेळी पालन करण्यासाठी सरकार देत आहे अनुदान, लगेच करा अर्ज
Sheli Palan Anudan Yojana - 2022

Sheli Palan Anudan Yojana 2022 | राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे. अनेक शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी आधारवड बनू लागल्या आहेत. आज आम्ही अजून एका अशा योजनांबाबत माहिती सांगणार आहोत. (Sheli Palan Karj Yojana)
राज्य सरकारने पशूसंवर्धनाला चालना मिळावी यासाठी शेळी पालन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी अल्प दरात कर्ज वाटप केले जाते. यातून शेतकरी शेतीला जोडधंदा करून रोजगार निर्मिती करू शकतो. ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. शेळी पालन करून दूध व्यवसाय तसेच मांस व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती बरोबर जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करता येईल. फक्त तुमच्या कडे स्वतःच्या मालकीची किंवा भाडे तत्वाची जागा असणे आवश्यक आहे. (Sheli Palan Anudan Yojana 2022)
कोणता शेतकरी घेऊ शकतो फायदा?
-
- १०० शेळ्या आणि ५ बोकड ठेवण्यासाठी प्रशस्त जागा असावी. (९ हजार चौरस मीटर जागा असावी.)
- शेळ्यांना योग्य प्रकारचा चारा असावा.
- शेळ्यांची निगा योग्य राखता येत असावी.
- शेळी पालन करताना तुम्हाला प्रथम २ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल.
- शेळी पालन करण्याच्या अगोदर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट शेतकऱ्यांनी तयार करून ठेवावा.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक असावा.
- अनुसूचित जाती व जमाती यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
-
-
- आधार कार्ड
- 7/12 – 8 अ उतारा
- मतदान कार्ड
- रहिवासी पुरावा
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- बँक खाते माहिती
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
(बँका त्यांच्या बाजूने अजून कागदपत्रांची मागणी करू शकतात.)
-
असा करा अर्ज –
- सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेत जावा.
त्यानंतर त्यांच्या कडून शेळी पालन कर्ज योजनेचा अर्ज मागवून घ्या. - तो अर्ज व्यवस्थित भरा. आणि पुन्हा बँकेत जाऊन द्या.
तुमच्या तालुक्यातील कृषी संवर्धन विभागात जाऊन अनुदान अर्ज करा. - आणि बँकेशी संपर्क करा.