प्रेमात ती चूक झाली आणि तरुणीला कायमचा जगाचा निरोप घ्यावा लागला

पुणे : मागील बरेच वर्षापासून तरुण युवक, युवतीमधून गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड हे फॅट वाढतच चालले आहे. त्यातच पुणे हे तर अग्रेसर आहे. या प्रेम संबंधातून च बरेच वेळा जोडप्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.तर काही वेळेस कपल पैकी एकाने आत्महत्या केल्याचे आपण पाहतो आहे. पुण्यातील च एका 23 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने प्रेम संबंधातून नाराजी आल्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीने पुण्याच्या कोंडवा भागातील राहत असलेल्या बिल्डिंग च्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव जुही गांधी असे आहे. जुही गांधी ही बंगळूर मध्ये नोकरी करत होती. आई वडिलांना भेटण्यासाठी ती शनिवारी गावी आली होती. घरी आल्यानंतर ती तिच्या प्रियकराला बोलण्यासाठी फोन करत होती.
बरेच वेळा जुही ने फोन करून ही न उचलल्याने तिला राग आला. त्यामुळे तिने बिल्डिंग च्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.या रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलले. जुही गांधी ही मूळ पुण्याचीच आहे. तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण हे पुण्यामधील सिंहगड कॉलेज मध्ये पूर्ण झाले आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.