‘तिने मला फसवले…’ माधुरी दीक्षितच्या वाईट कामांचा मिथुन चक्रवर्ती यांनी केला खुलासा, म्हणाले…

मुंबई | बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितला आजही धगधग म्हणून ओळखले जाते. नव्वदच्या दशकापासून आतापर्यंत तिने बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. मिथुन चक्रवर्ती सारख्या दिग्गज अभिनेत्यापासून ते सलमान खान सारख्या अभिनेत्याबरोबर देखील तिने स्क्रीन शेअर केली आहे. तसेच रणवीर कपूर बरोबर देखील एक आयटम सॉंग केले आहे. त्यामुळे तिची प्रसिद्धी अजूनही गगनाला भिडलेली आहे.

 

मात्र एक काळ असा होता जेव्हा माधुरीचे नाव मिथुन चक्रवर्ती बरोबर जोडले जात होते. त्याकाळी मिथुन चक्रवर्ती यांचा बॉलीवूडवर मोठा दबदबा होता. तसेच त्यांचे सेक्रेटरी निर्मात्यांपेक्षा कलाकारांच्या चकरा मारायचे. अशात एकदा एकदा मिथुन चक्रवर्ती यांचे सेक्रेटरी रिक्कू राकेश नाथ यांनी मिथुन यांना माधुरीचा फोटो दाखवला. त्यांना माधुरी दीक्षित फार आवडली.

Advertisement

 

त्यानंतर त्यांनी माधुरी बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षित यांचे 90 च्या दशकात अनेक चित्रपट आले होते. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असताना माधुरी दीक्षित आणि मिथुन चक्रवर्ती या दोघांच्या अफेअरची चर्चा देखील रंगली होती. मात्र काही दिवसांनी या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

Advertisement

 

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले होते की माधुरीने मला फसवले आहे. कारण ज्यावेळी मिथुन चक्रवर्ती माधुरी साठी अनेक नवनवीन चित्रपटांची ऑफर घेऊन येत होते त्यावेळी माधुरी अनिल कपूर बरोबर चित्रपट करण्यात उत्सुक होती. यादरम्यान अनिल कपूर बरोबर तिचा तेजाब चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना पक्के समजले की माधुरी दीक्षित आपल्याला टाळत आहे. तिला आता आपल्याबरोबर काम करण्याची इच्छा उरलेली नाही.

 

मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की, ” ज्यावेळी मी माझ्या चित्रपटांसाठी माधुरीला विचारत होतो त्यावेळी ती वेगवेगळी कारणे देत होती. वेळ नाही, तारखा जुळत नाहीत, तब्येत बरी नाही अशी अनेक वेगवेगळी कारणे तिने मला दिली आणि अचानक माझ्यासमोर तेजाब चित्रपट आला. तेव्हाच मी समजून गेलो की, ती मला फसवत आहे.”

 

आता असे असले तरी माधुरी दीक्षित आणि मिथुन चक्रवर्ती हे दोघेही बरेच काळ एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आता एकत्र आले आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र स्टेज शेअर करताना दिसलेत. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगलेली दिसते.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *