शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

दिल्ली | बॉलिवूडमध्ये बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास एक काळ असा होता जेव्हा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि अँग्री यंगमॅन अमिताभ यांच्याऐवजी शत्रुघ्न सिन्हा यांना प्राधान्य देत असत.

 

त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी पाटणा येथे झाला. शत्रुघ्न सिन्हा हे पहिले बॉलिवूड अभिनेते आहेत ज्यांनी राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही यशस्वी खेळी केली. शत्रुघ्न सिन्हा यांना पहिल्यांदा 1970 मध्ये आलेल्या देव आनंद यांच्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. पण हा चित्रपट उशिरा प्रदर्शित झाला.

Advertisement

 

त्यामुळे त्यांचा ‘साजन’ (१९६९) हा पहिला चित्रपट मानला जातो. 1971 मध्ये आलेल्या ‘मेरे अपने’ चित्रपटातून यशाची चव चाखणाऱ्या शत्रुघ्नने याआधी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. 1973 मध्ये आलेला ‘सबक’ हा त्यांचा दुसरा यशस्वी चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी पुनम यांच्या बरोबर स्क्रीन शेअर केली होती. आज या बातमीमधून त्यांच्या पत्नी विषयी जाणून घेऊ.

Advertisement

 

पूनम एके काळी ब्युटी क्वीन राहिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे, पण त्यांची पत्नी तितकी लोकप्रिय नाही. मात्र, त्यांच्या काळातील सुंदर अभिनेत्रींमध्ये पुनम यांची गणना होते . 1968 मध्ये पूनम यांनी मिस यंग इंडियाचा ब्युटी खिताबही जिंकला होता. 1968 मधला जिगरी दोस्त हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

 

चित्रपटांसाठी पूनमने स्वतःचे नाव बदलून कोमल ठेवले. 1980 मध्ये लग्न त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, शत्रुघ्न आणि पूनम एका प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये भेटले होते. यानंतर, कामाच्या संदर्भात ते अनेक वेळा भेटले आणि अखेरीस त्यांनी 1980 मध्ये लग्न केले. लग्नानंतर कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पूनमने अभिनयाला राम राम ठोकला.

 

तीस वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर त्यांनी साल २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटात मल्लिका हमीदा बानो बेगम -सम्राट अकबरच्या आईची भूमिका साकारली. त्यांनी राजकीय विश्वात देखील नशीब आजमावले. 16 एप्रिल 2019 रोजी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. तर त्यांचे पती शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपचा राजीनामा देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या लखनौ (लोकसभा मतदारसंघ) येथून राजनाथ सिंह यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवत होत्या. मात्र यात त्यांचा प्रभाव झाला.

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *