क्रिकेट विश्वाला हादरा! दिग्गज खेळाडूचे निधन; 100हून अधिक सामन्यांमध्ये केली होती मोठी कामगिरी

 

Join WhatsApp Group

नवी दिल्ली. आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग असलेले पाकिस्तानी पंच असद रौफ त्यांचं वय (66) वर्षे असून बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा भाऊ ताहिर याने म्हटले. माजी पंचांच्या भावाने सांगितले की, मृत्यूपूर्वी तो दुकान बंद करून घरी जात होता, मात्र अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो वाचू शकला नाही.

 

2006 ते 2013 या काळात रौफ आयसीसीच्या एलिट अंपायर पॅनेलचा सदस्य होता. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोपही त्याच्यावरi ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2016 मध्ये बीसीसीआयने रौफला भ्रष्टाचारात दोषी ठरवले होते. त्यामुळे त्याच्यावर पाच वर्षांची क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. 2013 च्या आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी अंपायरला आरोपी म्हणून घोषित केले होते.

 

असद रौफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकूण 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यात 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. पाकिस्तानी पंच 2013 मध्ये सर्व प्रकारच्या अंपायरिंगमधून निवृत्त झाले होते.

 

असद रौफ यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर रौफचे चाहतेही त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत आणि त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button