आर्यन खानमुळे शाहरुख पुन्हा अडचणीत? वाचा आता नेमकं काय झालंय

मुंबई | शाहरुख खान चे चाहते आज फक्त भारतात नाही तर जगभरात पसरलेले आहेत पण मुलगा आयन खान मुळे गेल्या एक वर्षापासून तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
गेल्या वर्षी आर्यन खानच्या बातम्यांनी जणू काही धुमाकूळच घातला होता त्याचबरोबर सोशल मीडियावरही या बातम्यांचा भडिमार सुरू झाला होता. आता पुन्हा एकदा आर्यन खान चे जुने ड्र ग्स प्रकरण उघडण्यात आले आहे.
ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुखच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. ड्र ग्ज प्रकरणात तब्बल 26 दिवस आर्यन खान कोठडीत होती. NCBकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या के समध्ये निर्दोश सुटका करण्यात आली मात्र आता या प्रकरणात NCBकडून मोठी माहिती समोर आली आहे.
आर्यन खानच्या ड्र ग्ज प्रकरणार नार्को टिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेचNCBने सर्वांना चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार, NCBनं दिल्ली मुख्यालयात आर्यन खान ड्र ग्ज प्रकणार एक रिपोर्ट सादर केला आहे ज्यात या प्रकरणाची चौ कशी योग्यरित्या झाली नाही.
NCBच्या स्पेशल टीमनं सादर केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, “या प्रकरणाची तेव्हाही चौकशी केली जात होती आणि आजही त्यावर काम केलं जात आहे. त्यांच्या कामात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात 7-8 अधिकाऱ्यांची भूमिका तपास पथकाला संश यास्पद वाटल्यानं त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.
आर्यन खान आणि पाच जणांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले नाहीत, असं स्पष्टीकरण NCBकडून देण्यात आलं होतं. पण यामुळे शाहरुख टेन्शन वाढणार आहे.