शाहिद कपूरची पत्नी दिसते खूपच सुंदर; करते हे काम

दिल्ली | अभिनेता शाहीद कपूरने आज अभिनयात यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. त्याच्या अभिनयाच्या सुरवातीला तो आगामी शाहरुख खान होईल असं अनेक जण म्हणत होते. मात्र त्याने वेळोवेळी आपल्या जबरदस्त अभिनयाने तो शाहरुख पेक्षा वेगळा आणि अनोखा अभिनेता आहे हे सिद्ध करून दाखवले.

 

शाहिद कपूरने इश्क विश्क या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं. करीना कपूर बरोबर त्याचा हा पहिला चित्रपट होता. पहिलाच चित्रपटांमधून त्याला घवघवीत यश मिळालं. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यु हा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर ३६ चायना टाऊन, जब वी मेट या चित्रपटाने त्याला क्यूट आणि हँडसम अशी विशेषणा मिळाली. अनेक मुलींसाठी तो क्रश झाला होता.

 

त्यानंतर मधल्या काळात त्याचे बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र हार न मानता त्याने आपली मेहनत सुरूच ठेवली. त्यानंतर हायडर या चित्रपटांमधून त्याने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं. या चित्रपटांमध्ये त्यांनी एक वेगळा धाटणीची भूमिका साकारली. चॉकलेट बॉय आणि क्युटनेस असलेला त्याचा हा टॅग या चित्रपटांमधून पुसला गेला. या चित्रपटानंतर त्याला रावडी आणि धतिंग असं म्हटलं जाऊ लागलं. शानदार आणि उडता पंजाब या चित्रपटांमध्ये देखील त्याचा धडाकेबाज अभिनय पाहायला मिळाला.

 

त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या रोमँटिक भूमिकेत त्याने पदार्पण केलं. मात्र यावेळी देखील त्याने चॉकलेट बॉयचा टॅग स्वतःला लावून घेतला नाही. कबीर सिंग या चित्रपटामध्ये त्याने भरपूर किस सीन दिले. मात्र यावेळी रोमँटिक पेक्षा त्याचा खतरनाक अभिनय पाहायला मिळाला.

 

शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांनी साल २०१५ मध्ये लग्न केले. मीरा दिसायला खूप सुंदर आहे. मात्र ती बॉलीवूड पासून खूप दूर आहे. या दोघांना मिशा आणि जैन नावाची दोन मुलं आहेत. मीरा राजपूत दिल्लीत वाढली, ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचा जन्म 7 सप्टेंबर 1994 रोजी दिल्लीत झाला. मीरा राजपूत आणि शाहिद कपूरचे कुटुंब एकमेकांना आधीच ओळखत होते. मीरा राजपूत शाहिद कपूरपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.

 

तिने सुरुवातीचे शिक्षण वसंत व्हॅली स्कूलमधून पूर्ण केले. नंतर तिने संयुक्त राष्ट्रात इंटर्नशिपही केली आहे. मीरा राजपूतने लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची देखील पदवी घेतली आहे. मीरा राजपूत लवकरच एका व्यावसायिक जाहिरातीत दिसणार आहे ज्याची ती तयारी करत आहे. तिने अद्याप कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत काम केलेले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button