घरा बाहेर बसलेल्या अपंग मुलाला पाहून अमिताभ यांनी केले असे काही की ज्याची होतेय तुफान चर्चा

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी अमिताभ बच्चन बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या अभिनयामुळे अगदी लहानांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत त्यांचा चाहता वर्ग बनलेला आहे. गेल्याच महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. आता त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी दिलेली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतात. कोरोनामध्ये संक्रमित झाल्यानंतर आता त्यांचे आयसोलेशनचे दिवस संपले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले आहे की, ” तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी कोरोना मधून पुन्हा एकदा बाहेर आलो आहे. माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो. नऊ दिवस मी आयस्युलेशनमध्ये होतो. आता मी पूर्णतः बरा झालो आहे. मात्र अधिक खबरदारी साठी मला आणखीन सात दिवस जास्त व्यक्तींमध्ये जाता येणार नाही. ”
बिग बी अमिताभ बच्चन आपल्या परिवाराबरोबर जलसा या बंगल्यात राहतात. प्रत्येक रविवारी त्यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमा होत असते. अमिताभ बच्चन देखील न चुकता दर रविवारी बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात. त्यांचे असलेले प्रश्न देखील ऐकतात. अशात यावेळी चाहत्यांच्या गर्दीत त्यांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली.
बिग बी हे बॉलीवूडवर जरी राज्य करत असले तरी देखील ते नेहमीच सामान्य व्यक्तीप्रमाणे चाहत्यांबरोबर संवाद साधतात. आपला चाहता कितीही गरीब असला तरी देखील ते त्याला झिडकारत नाहीत. अगदी आपुलकीने ते त्याची विचारपूस करतात.
आता सोशल मीडियावर त्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चाहत्यांच्या घोळक्यात त्यांची नजर एका दिव्यांग लहान मुलावर पडली. हा चिमुकला सकाळपासून अमिताभ बच्चन भेटतील म्हणून जलसाबाहेर थांबला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला लगेचच स्वतः जवळ बोलावून घेतले. तसेच त्याची विचारपूस करत त्याच्याबरोबर वेळ घालवला. अमिताभ बच्चन यांना भेटल्यामुळे त्या दिव्यांग मुलाच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. अमिताभ यांनी त्याला खाऊ आणि तसेच काही भेटवस्तू देखील दिल्या.
अमिताभ बच्चन यांनी एका गरीब मुलांबरोबर केलेले वर्तन पाहून सर्वच जण त्यांचे कौतुक करत आहेत. अमिताभ बच्चन आजही बॉलीवूड मध्ये कार्यरत आहेत. लवकरच त्यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात कोरोनाच्या महामारी मधून देखील ते सुखरूप पणे बाहेर आले आहेत. तसेच दिव्यांग चाहत्यासाठी त्यांनी केलेले वर्तन पाहून अनेक जण आता खुश आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.