सासऱ्याला पाहून ऐश्वर्याचा सुटला ताबा; थेट अमिताभ बच्चन यांचीच घेतली किस

मुंबई | मिस वल्डचा किताब आपल्या नावे नोंदवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कामगिरीने प्रकाश झोतात राहते. नेहमीच पेज 3 वरील तिच्या आयुष्यावर होणाऱ्या चर्चेचा कॉलम लक्ष वेधी ठरत असतो. सध्या तिच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट चर्चेत आली आहे.
सासरे आणि सुन हे दोघेही नेहमीच आपल्या नात्याला बापाचे आणि मुलीचे नाते बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हा प्रयत्न एका सोहळ्यात ऐश्वर्याला महागात पडला आहे. तिने यावेळी चक्क एक अशी गोष्ट केली की ती नेहमीच चर्चेत येत असते. यावर तिने आणि अमिताभ यांनी कितीतरीवेळा स्पष्टीकरण दिले आहे. मात्र चाहते ही गोष्ट अजूनही विसरलेले नाही.
साल 2015 रोजी बच्चन सून आणि सासरे यांच्या जोडीने स्टारडस्ट अवॉर्ड फंक्शन सोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती. यावेळी बिग बींचा ” पा” हा चित्रपट चर्चेत होता. यासाठी त्यांना उत्तम अभिनेता म्हणून सन्मानित देखील केले गेले. तसेच ऐश्वर्याला तिच्या “जज्बा” या चित्रपटासाठी देखील सन्मानित केले गेले. यावेळी ऐश्वर्या प्रचंड खुष झाली होती. तिच्या सासऱ्यांना आणि तिला एकत्र पुरस्कार मिळाल्याने ती अमिताभ बच्चन यांच्या बरोबर छोट्या मुली प्रमाणे बोलू लागली. एवढेच नाही तर तिथे उपस्थित सगळ्यांसमोर तिने बिग बींना गालावर चुंबन केले.
हे पाहून सगळेच थक्क झाले. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे सगळे याची चर्चा करू लागले. तेव्हा बिग बींचा देखील चेहरा उतरला होता. त्यांना ऐश्वर्याचे वागणे आवडले नव्हते. ती त्यांना बाबा मनात असली तरी समाजासाठी ते तिचे सासरे आहेत. त्यामुळे ते तिच्यावर प्रचंड चिढले होते. तसेच ते तिला म्हणले की, ” हे काय आहे, स्वतःला आवर तू आराध्या नाही लहान मुलांसारखी वागू नको.” त्यावेळी ऐश्वर्याच्या चुंबनाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांच्या अभिषेक बच्चन या मुलाबरोबर साल 2007 मध्ये ऐश्वर्याने लग्न केले. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे दोघेही नेहमीच आपल्या सुनेची गुणगाथा गात असतात. ऐश्वर्या देखील फार गुणी आहे. तिने तिचे सासर आणि अभिनय या दोन्ही गोष्टी तिने नीट सांभाळल्या आहेत.
एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, ” ऐश्वर्या खूप छान आहे. आम्हला जशी हवी होती तशीच सून आम्हाला मिळाली आहे. ती आमच्याशी खूप प्रेमाने वागते. मनाने ती खूप साधी आहे. अमिताभ बच्चन तिला पाहून नेहमी खुश होतात. त्या दोघांमध्ये बाप आणि लेकीचे नाते आहे. ” असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.