दहावीत शिकणाऱ्या सायलीचा काही क्षणातच झाला मृत्यू; वाचून डोळ्यात पाणी येईल

मालवण : कोणाचा काळ कशाने येईल आणि कधी येईल हे सांगता येत नाही. कातवड या ठिकाणी राहणारी सायली संजय धुरी वय वर्ष 16 ,या मुलीचा कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मृत्यू झाला. सायली धुरी ही विद्यार्थिनी मालवणच्या हायस्कूल मध्ये शिकत होती. भंडारी हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये सायली शिक्षण घेत होती.
गेल्या बरेच दिवसापासून ती आजारी होती. सायली वर कोल्हापूर मधील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. साईलीला कावीळ झालेली असल्याने ती दवाखान्यात बरेच दिवसापासून ॲडमिट होती. गेल्या दोन दिवसापासून सायलीची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी प्रकृती खूपच खालावल्याने सायलीचे निधन झाले.
सायली ही दहावीचा वर्ग मध्ये खूप हुशार मुलगी होती. अचानक जाण्यामुळे सर्वांना वाईट वाटले. सायलीच्या पश्चात तिच् आई-वडील ,काका, भाऊ बहीण असा परिवार आहे. सायलीच्या आकस्मित मृत्यूमुळे संपूर्ण कातवड गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या तरुण मुलीचा मृत्यू झालेला पाहून सायलीच्या आई-वडिलांनी आक्रोश करायला सुरुवात केली. सायलीच्या मूर्तीचे आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे