आत्ताच्या घडामोडी

सिनेसृष्टी हादरली! KGF मधील प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; देशावर शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. 2022 वर्ष हे अभिनय क्षेत्रातील दिग्गजांसाठी धोक्याच असल्याचे म्हटले जात आहे. लता मंगेशकर, रमेश देव यांच्या सारख्या दिग्गजांचे निधन झाले आहे.

 

त्यामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी या सारख्या गायकांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीवर अनेक दिवस शोककळा पसरली होती. या दिग्गजांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

KGF 2 या चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्याचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मोहन जूनेजा असे त्यांचं नाव आहे. त्यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यांनी आत्तापर्यंत 100हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. सुरुवातीला ते हास्य कलाकार म्हणून काम पाहत असे त्यानतंर त्यांना मोठ्या चित्रपटात संधी मिळू लागली. हळूहळू ते उंच शिखरावर जाऊन पोहचले होते.

 

त्यांनी KGF 2 या चित्रपटात पत्रकार या पत्राचा रोल केला होता. त्यानंतर ते खूपच चर्चेत आले होते. त्यांचा लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

बेंगळुरू येथील रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button