Sarkari Yojana: खात्यात जमा होणार १ हजार रुपये; लगेच करा ऑनलाइन अर्ज

E - Shram Yojana Online Application - 2022

E – Shram Yojana | राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक योजना (Yojana) आणल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. केंद्र सरकारने (Center Government) कामगारांसाठी काही दिवसांपूर्वी E – shram Card ही योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांना आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे.

Join WhatsApp Group

त्यापूर्वी या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर सरकार (Government) लवकरच तुम्हाला १ हजार रुपये तुमच्या बँक खात्यात पाठवेल. अशी माहिती समोर आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता ५०० रुपयांचा सरकार लवकरच तुमच्या खात्यात (Bank Account) पाठविनार आहे. मात्र जर तुम्ही ई श्रम पोर्टल (E Shram Portal) वर जाऊन नोंदणी केली नसेल तर 30 जानेवारी पर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे.

त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा फायदा (Yojana Benefits) घेता येईल. कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत. जर या योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि अपघाती मृत्यू (Daith) झाला तर सरकार कडून तुम्हाला 2 लाख रुपये अपघाती विमा दिला जातो. तसेच जर अपंगत्व आले तर 1 लाख रुपये दिले जातात. याबरोबरच तुम्ही एक भारतीय कामगार आहात याची माहिती शासनाला मिळते.

आणि शासन नवीन योजना आणल्यानंतर त्यात लगेच तुमचा समावेश करून घेते. त्यामुळे ही योजना अत्यंत लाभदायक मानली जात आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत 11 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 30 जानेवारी पर्यंत या योजनेसाठी कामगारांना नोंदणी (Online Application) करण्यात येणार आहे. EPFO किंवा NPS च्या सदस्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

या योजनेचां अर्ज करायचा असल्यास तुम्ही  https://eshram.gov.in/ वर जाऊन करू शकता. या योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता 500 रूपये लवकरच शासन तुमच्या खात्यात जमा करणार आहे. तसेच या योजनेचा पुढील दुसरा हप्ता देखील 500 रुपयांचा शासन थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे या योजनेतून 1 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button