आत्ताच्या घडामोडी

मराठमोळ्या अलका कुबलचा पती आहे ‘हा’ प्रसिध्द दिग्दर्शक; दिसतो खूपचं देखणा

पुणे | मराठी फिल्म इंडस्ट्री म्हटलं की सर्वात पहिलं नाव निघत ते म्हणजे अलका कुबल यांचं, त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम केले.

 

त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळू लागली, आणि त्यांनी बड्या चित्रपटात काम केले. त्यांच्या अभिनयामुळे रसिकांनी त्यांना फार लवकर डोक्यावर घेतलं, त्यांनी 100 हून अधिक मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे.

 

त्यांनी माहेरची साडी, जखमी कुंकू, अग्नीपरिक्षा, वहिनीची माया, कर्तव्य, तुळस आली अंगणी, धरलं तर चावतय, लेक चालली सासरला अशा दिग्गज चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्याकडे कायम सासरवसाचा रोल आपण पाहिला आहे.

 

प्रत्येक चित्रपटात त्या शांत आणि संयमी दाखवल्या आहेत. अलका कुबल यांचा चाहता वर्ग अजून देखील मोठा आहे. अलका यांच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहे.

 

अलका कुबल यांच्या पतीचे नाव समीर आठल्ये आहे. समीर यांनी 1985च्या दशकापासून मराठी आणि हिंदी दोन्ही मिळून 200 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी निर्माते म्हणून काम पाहिलं आहे. समीर हे एक प्रसिध्द निर्माते म्हणून ओळखले जातात.

 

घायाळ, खतरनाक, कुंकू लावते माहेरच, मासूम, ऐसी भी क्या जल्डी हैं यापेक्षा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून समीर आणि अलका यांचा विवाह झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button