सलमान खान आयुष्यभर राहणार बिन लग्नाचा, वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

दिल्ली | बॉलीवूडचा दबंग याच्या सुपरहिट चित्रपटांनी नेहमी चर्चेत असतो. त्याचा अभिनय खरोखर कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्याने आता पर्यंत कोणत्याही अभिनेत्री बरोबर किस सीन केलेले नाहीत. ९० च्या दशकापासून तो चित्रपटात काम करतो आहे.
सुरुवातीला त्याने अगदी साध्या सरळ आणि लाजाळू मुलगा अशा भूमिका केल्या. त्यानंतर आता तो बरेच ॲक्शन चित्रपट करतो आहे. त्याचा अभिनय सर्वांना आवडतो. अशात एवढ्या चित्रपटात तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येतील असेच चित्रपट करतो.
त्यामुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि सर्व तरुणाई त्याच्यावर फिदा आहे. त्याच्या अभिनयाचे गोडवे गावे तेवढे कमीच आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात तो खूप वेगळा आहे. त्याने आता वयाची ५४ वर्षे ओलांडली आहेत. मात्र अद्याप तो सिंगल आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची नेहमीच चर्चा होते.
त्याच्या लग्नाची माहिती घेण्यासाठी सर्व चाहते खूप आतुर असतात. कधी एकदा तो लग्न करणार याची सगळेच वाट पाहत आहेत. मात्र अजूनही लग्नाचा विचार त्याच्या मनाला शिवलेला सुद्धा नाही. पण त्याच्या वडिलांनी म्हणजे सलीम खान यांनी त्याच्या लग्नाविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सगळेच चकित झाले आहेत.
त्यांच्या या वक्तव्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. एका मुलाखतीमध्ये सलीम यांनी सांगितलं आहे की, ” सलमान अजून एकदाही प्रेमात पडला नाही. त्यामुळे तो अविवाहित आहे. कदाचित तो जेव्हा प्रेमात पडेल तेव्हाच तो लग्न करेल.
” त्याच्या वडिलांनी दिलेली ही प्रतिक्रिया ऐकून हसावं की रडाव हेच समजत नाही. कारण सलमानने आता पर्यंत अनेक अभिनेत्रीना प्रेमाची आणि संसाराची स्वप्ने दाखवली आहेत. ऐश्वर्या पासून ते कॅटरीना पर्यंत अनेक नावाजलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात तो पडला आहे. त्यामुळे सलीम खान यांचे हे वक्तव्य आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.