सलमान खान सोबत काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे निधन; ५०हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

मुंबई | 80 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते अरुण वर्मा यांचे 20 जानेवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसाठी कोऑर्टिस्ट म्हणून काम केले होते. अरुण वर्मा यांचे गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास भोपाळ येथील पीपल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. एका दीर्घ आजाराने ते बऱ्याच काळापासून उपचार घेत होते. मात्र वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

अरुण वर्मा यांचा अभिनय अतिशय दमदार होता. सुरुवातीला त्यांचा कल जास्त करून नाटकांमध्ये दिसत होता. आजवर त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाची वाटचाल बॉलीवूड कडे वळवली. अरुण वर्मा यांनी जेपी दत्ता दिग्दर्शित साल 1987 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट “डकैत” मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अरुण वर्मा यांनी हिना, खलनायक, प्रेम ग्रंथ, नायक, मुझसे शादी करोगी, हिरोपंती अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

 

अक्षय कुमार कंगना राणावत आणि सलमान खान बरोबर देखील त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. लवकरच कंगनाचा “टिकू वेड्स शेरू ” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये देखील अरुण वर्मा यांचा अभिनय पाहायला मिळेल. नुकतेच त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण केले होते. बॉलीवूडचा भाईजान असलेल्या सलमान खानच्या “किक” या चित्रपटात देखील त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता.

 

त्यांच्या निधनामुळे चाहते पूर्णतः शोक सागरात आहेत. तसेच अनेक जण त्यांच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. अरुण वर्मा यांचे निधन मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ” त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. तसेच त्यांचे फुफ्फुस देखील निकामी झाले होते. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले.”

 

टीना घाई या अरुण वर्मा यांच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या. त्यांचा असं म्हणणं आहे की, अरुण यांच्या वरती मोठा आर्थिक संकट देखील होतं. आजारपणात उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी स्वतः त्यांना 25 हजारांची मदत केली. तसेच टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन मार्फत त्यांना 50 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.

 

मोठमोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री व्यतिरिक्त अनेक कलाकार मंडळी कार्यरत असतात. या सर्वांमुळेच चित्रपट हिट ठरतात. चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री यांचे महत्त्वपूर्ण योगदान असतेच मात्र सहकलाकार देखील चित्रपट हिट ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

 

चित्रपट गाजल्यानंतर मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री यांना अधिक मानधन दिले जाते. मात्र अरुण वर्मा यांच्यासारख्या सहकलाकारांना कमी पैशांमध्येच अभिनय करावा लागतो. आपल्या कलेच्या प्रेमाखातर कलाकारांवर नंतर शेवटच्या दिवसात अशी परिस्थिती ओढवते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button