सलमान खानवर दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दिग्गज अभिनेत्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

यात लता मंगेशकर यांचा देखील समावेश आहे. लता दीदी अनेक दिवस रुग्णालयात राहून मृत्यू सोबत झुंज देत होत्या. मात्र त्यांची मृत्यू सोबत सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर पूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात आला होता.

 

अनेक कलाकार मंडळींनी जगाचा निरोप घेटल्याने अभिनय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे सलमान खानवर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

 

बॉलिवूडचे दिग्दर्शक सावन कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते एक गीतकार म्हणून देखील ओळखले जायचे. तसेच ते अत्यंत चांगले लेखक देखील होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूड मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानतंर ताबडतोप त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यू सोबत त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. सावन हे बॉलिवूड मधील प्रसिध्द दिग्दर्शक होते. मात्र त्याधी ते सलमान खान याचे सर्वात जवळचे मित्र होते.

 

सलामन खान सोबत त्यांचे अत्यंत जवळचे नाते मानले जातं होते. त्यांच्या निधनावर सलमान खान याने स्वतः पोस्ट लिहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या सोबत असलेला एक फोटो सलमान खान याने जोडला आहे. सावन यांना अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button