साजिद खानमुळे बिग बॉसची वाढली डोकेदुखी

मुंबई | रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 16च्या निर्मात्यांची डोकेदुखी सध्या वाढलीये. साजिद खान बिग बॉस 16 च्या घरात दाखल झाल्यापासून मोठा वाद बाहेर सुरूय. बिग बॉसच्या घरात साजिद खान सर्वांसोबत चांगला राहत असताना बाहेर प्रचंड गदारोळ सुरू झालाय.

Join WhatsApp Group

 

दिवसेंदिवस साजिद खान विरोधातील मोहिम जोर पकडू लागलीये. अनेक अभिनेत्री आता सोशल मीडियावर थेट व्हिडीओ शेअर करत साजिद खानने आपल्यासोबत कसा छळ केला हे सांगत आहेत. इतकेच नव्हे तर साजिद खानमुळे सलमान खानवरचा रोषही वाढतोय.

 

बिग बॉस सीजन 16 मध्ये कोण कोण स्पर्धक येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. यातच साजिद खान यांचं नाव आलं. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता अनेक अभिनेत्री पुढे आल्या असून बिग बॉसच्या घरातून साजिद खानला बाहेर काढा असे म्हणत बिग बॉसच्या निर्मात्यांवर दबाव आणत आहेत.

 

अशा व्यक्तीला तुम्ही बिग बॉसच्या घरात कसे घेऊ शकता असा प्रश्न अभिनेत्री उपस्थित करत आहेत. यामुळे पुढच्या आठवड्यात साजिदला बिग बॉसच्या घराबाहेर काढणार असून याला सलमान खानने देखील होकार दिल्याचे कळत आहे.

 

अनेक अभिनेत्रींनी साजिद खानला केलं me too:
अनेक अभिनेत्रींनी me too चा आरोप केलाय मात्र असे असताना साजिद खानला बिग बॉसच्या घरात येतं आले असाही आरोप केलाय. साजिद खानची बहिण फराह खान आणि सान खानचे चांगले संबंध असल्याने साजिदला बिग बॉसमध्ये घेतलं असल्याचं म्हटलं जातंय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button