दुःखद! मुलगा होत नव्हता यात तिची काय चूक? पतीच्या चुकीमुळे पत्नीचे निधन

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. छोट्याशा कारणावरून पती पत्नी मध्ये वाद होत आहेत. आणि त्या वादा मधूनच हत्याकांड निर्माण होत आहे. कोल्हापूरमध्ये अशाच वादातून एका महिलेची हत्या झाल्याची उघडकीस आली आहे.

 

या दुर्घटनेत त एका महिलेचा तिच्यात पतीने दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी एकनाथ पाटील असे मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळी पहाटे ही हत्या झाल्या झाली असल्याचे मयत अश्विनी पाटील ह्याच्या घरच्यांनी पती विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेतील आरोपी एकनाथ पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

 

मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी पाटील आणि एकनाथ पाटील यांना दोन मुले आहेत. परंतु त्यांना मुलगा नसल्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद होत असत. वंशासाठी दिवा असावा अशी इच्छा एकनाथ पाटलांची होती. मुलगा नव्हता म्हणून एकनाथ पाटील हे अश्विनीला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. आज पार्टी याच वादा मधून एकनाथ पाटील यांनी अश्विनी तिच्या गळ्याला दोरीने बांधले . यामध्ये अश्विनी चा मृत्यू झाला. ही गोष्ट पाटलांच्या घरी सगळ्यांना माहीत होती.

Advertisement

 

नंतर त्या सर्वांनी अश्विनीला विजेचा धक्का बसला अशी अफवा पसरवली. परंतु अश्विनीच्या घरच्यांनी पोलिसात एकनाथ पाटील विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीत एकनाथ हा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होता हे सांगितले. तसेच एकनाथ ने तिची हत्या केल्याचे ही पोलिसांना सांगितले. पोलिसांनी एकनाथला ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी खाकी दाखवल्यानंतर एकनाथ ने अश्विनी ची हत्या केल्याचे कबूल केले.पोलीस या घटनेची आणखीन कसून चौकशी करत आहेत. घटनेची पुढील माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर देऊ असे करवीर पोलिसांनी सांगितले. अश्विनीच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एकनाथ पाटलांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *