दुःखद! दोन दिवसांनी होता साखरपुडा मात्र त्यापूर्वीच तरुणीचा तरफडून मृत्यू; घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

भंडारा | दोन दिवसांनी साखरपुडा असल्यामुळे खरेदी करण्यासाठी गेलेले CRPF मधील बहीण आणि भाऊ यांचा अपघात झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली. समोरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीने कट मारल्यामुळे बहीण व भावाची गाडी रस्त्यावर पडली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने दोघांनाही चिरडले. बहीण जागेवरच ठार झाली तर भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे. अशी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असणारे देव्हडी गाव या ठिकाणी रेल्वे पुलावर हा अपघात झाल्याचे कळले. मृत मुलीचे नाव हे किरण सुखदेव आगाशे( २५) तर जखमी झालेल्या मुलाचे नाव हे लोकेश सुखदेव आगाशे ( २१) आहे. मुंबई मध्ये किरण ही CRPF मध्ये नोकरी करते. ती खरेदी कर यासाठी तालुक्याच्या ठिकाणी तिच्या भावासोबत आली होती.
खरेदी करून परत येत असताना. देव्हाडी या ठिकाणी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले गेले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने दोघांनाही चिरडले. अपघात झालेल्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. किरणच्या डोक्याचा पूर्ण चुराडा झाला होता. तर लोकेश सुधा गंभीर जखमी झाला त्याच्यावर उपचार चालू आहेत.
मुंबई मध्ये किरण सीआरपीएफ मध्ये नोकरी करते. तिचे लग्न ८ दिवसांनी होते. त्यामुळे ती खरेदीसाठी गावी आली होती. दोन दिवसानंतर तिचा साखरपुडा होणार होता. परंतु खरेदी करून परत येत असतानाच तिच्यावर काळाने डाव घातला. आणि अपघातात किरण ठार झाली. तिच्या पालकांना ही माहिती मिळताच त्यांनी आक्रोश करायला सुरुवात केली. घरात आनंदाचे वातावरण होते.ते काही क्षणातच नष्ट झाले. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी झालेल्या अपघाानंतर किरण ठार झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली. त्याच्यातील आनंद काही क्षणातच नाहीसा झाला होता.