दुःखद! 16 वर्षाच्या मुलाचे अचानक निधन, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

बांदा : गेल्या काही दिवसापासून निरनिराळ्या ठिकाणच्या शाळकरी तरुण मुलांचे निधन होत असताना दिसत आहे. अशीच एक घटना बांदा या ठिकाणी घडली आहे. बांदा येथील खेमराज हायस्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर महाविद्यालय या महाविद्यालयात शिकत असणारी विद्यार्थिनी क्रांती कृष्णा नाईक (वय १६, रा. असनिये) या तरुण विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री निधन झाले. क्रांतीला उच्च मधुमेह हा रोग होता. महाविद्यालयामध्ये क्रांतीची हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळख होती. आजारी असूनही क्रांती नेहमी प्रशालेत येत असे.
गुरुवारी सकाळी तिला प्रशालेत असताना खूपच त्रास जानवू लागला. त्यामुळे शिक्षकांनी तिला ताडीने हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले. उपचार केल्यानंतर क्रांती घरी गेली. परंतु तिचा त्रास कमी झाला नाही. घरच्यांनी तिला पुन्हा अधिक उपचारासाठी तिला खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले . परंतु तरीही क्रांतीचा त्रास कमी न झाल्याने तिला सावंतवाडी या ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
उपचारा चालू असताना तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे क्रांतीला बांबोळी या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, उपचारांना तिच्या प्रकृती कुठल्याच प्रकारची साथ मिळत नव्हती. शेवटी शुक्रवारी रात्री क्रांतीची प्राणज्योत मालवली.
११ वी कला शाखेत क्रांती शिकत होती. महाविद्यालयात अत्यंत प्रेमळ, अभ्यासू अशी क्रांतीची ओळख झाली होती. बांदा प्रशालेच्या कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका एम. एम. सावंत यांनी असनिये येथे जाऊन क्रांतीच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. बांदा प्रशालेतही क्रांतीला सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. क्रांतीच्या पश्चात आई,बहीण,भाऊ व वडील, असा परिवार आहे. क्रांतीच्या निधनाने असनिये गावावर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी आणि शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी हळहळ व्यक्त केली.