दुःखद! आईने ती चूक केली अन् तरुणाने आयुष्याचं संपवलं; घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

परभणी | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यामधील वझुर गावातील एका तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आकाश महादेव टाले आहे. गंगाखेड पोलीस चौकीत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आकाश हा पूर्णा तालुक्यातील वाझुर या गावी राहत होता. रोज रात्रीच्या वेळी आकाश हा आपल्या शेतात झोपायला जात असे. परंतु यावेळी आकाशच्या आईने त्याला अंधार खूप असल्याने म्हणले की शेतात झोपायला जाऊ नकोस, जर शेतात झोपायला गेलास तर शेतातच झोप घरी येऊ नकोस. या आईच्या वाक्यामुळे आकाश ला राग आला त्यामुळेच त्याने आईचा राग मनात धरून त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले आणि शेतातच लिंबाच्या झाडाला फास घेतला.
सकाळी आकाश हा उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्याच्या आईने शेतात गेली आणि पाहणी केली. असता तो लिंबाच्या झाडाला लटकलेला दिसला. त्याच्या आईने आरडाओरड करून गावातील लोकांना जमा केले. या घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस देखील पोहचले आणि त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आकाशच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांचा मोठा आधार हरपल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच गावातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.