दुःखद! मुलांना वाचवताना आईचा गेला जीव; मुले वाचली मात्र आईचा मृत्यू, वाचून डोळ्यात पाणी येईल

शिराळा |तडवळे या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत मुले बचावली गेली परंतु मुलांची आई मात्र काळाने हिरावून घेतली. घरच्या पुढे उभा केलेला ट्रॅक्टर हा आपल्या दोन मुलांच्या अंगावर येत असल्याचे पाहून आई धावत गेली मुलांना वाचवले पण त्याच ट्रॅक्टरचा नांगर हा आईच्या डोक्यात घुसला गेला. मुलांना वाचायला जात असताना आईचा पाय घसरला गेला आणि ती खाली पडली. उठताना तिच्या डोक्यात नांगर घुसला गेला. जखमी आईला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले परंतु उपचार चालू असतानाच आईचा मृत्यू झाला. रक्तबंबाळ झालेल्या आईचा जीव गेला.
मिळालेल्या माहितीनुसार संचिता संपत पाटील ही महिला जनावरांचा गोठा झाडत होती. त्यांचाच ट्रॅक्टर हा रस्त्याच्या कडेला उभा होता. मंगळवारी सायंकाळच्या वेळी गोठा झाडत असतानाच त्यांची दोन मुले रस्त्यावरच खेळत होती. रस्त्यावरील ट्रॅक्टर हा मुलांच्या दिशेने येत होता, ट्रॅक्टर मध्ये कोणीच नाही हे पाहून सांचीता धावत गेली मुलांना वाचवण्यासाठी जीवाचे रान केले.
ट्रॅक्टरच्या बाजूला दोन्ही मुलांना तिने केले. परंतु तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली त्याबरोबर ट्रॅक्टर ला जोडलेला नांगर हा तिच्या डोक्यात घुसला. ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली. संचीतला इचकरंजीतील दवाखान्यात घेऊन नेण्यात आले. उपचार चालू असतानाच संचिताचा जीव गेला. संचीताने आपल्या दोन लहान मुलांना वाचवले परंतु तिचा जीव मात्र गेला. संचिताचा निधनाने गावभर शोककळा पसरली.
संचिताचा पाठीमागे तिची दोन लहानगी मुले, पती, सासू ,सासरे, दोन दिर , जावा आहेत. या बाबत शरद बबन पाटील यांनी घटनेची शिराळा पोलिसात माहिती दिलीपोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली. हवलदर राजेंद्र माने हे या घटनेचा तपास करत आहेत. आपल्या दोन मुलांचा जीव वाचवताना माऊलीचा जीव गेला यामुळे परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.