दुःखद! नुकताच झाला होता वाढदिवस, हॉटेलही केलं होते चालू, मात्र काळाने घाला घातला आणि कल्याणीचे स्वप्न अधुरं राहिलं

कोल्हापूर | तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मालिका विश्वात दुःखद वातावरण दिसून येतय. हा अपघात अभिनेत्रीचा ‘प्रेमाची भाकरी’ या हॉटेलजवळ झाला. हे हॉटेल कोल्हापूर सांगली महामार्गावर आहे. या महामार्गाच्या रस्त्याची चाळण झाली आहे. याआधी देखील अनेक लोकांचे या ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Join WhatsApp Group

 

अभिनेत्रीन पंधरा दिवसांपूर्वी हॉटेल सुरू केलं. त्याचप्रमाणे आठवड्याआधी तिचा वाढदिवस झाला आहे. रात्री तिनं आपल्या आई वडीलांना तसेच मुलाला हॉटेलवर जेवायला बोलवलं. जेवण ,गप्पा गोष्टी झाल्या. घरी निघताना अभिनेत्री बाहेर पडली अशावेळी घरातील सदस्यांच्यासमोर अभिनेत्रीवर काळाने घाला घातला. डंपरची भरधाव वेगात धडक झाली. यामुळे अभिनेत्रीचे जाग्यावर निधन झालं.

 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिन भाकरी बनवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आणि त्याला कॅप्शन दिले; माझा का वाढदिवस प्रेमाची भाकरी करत आणि इतरांना खाऊ घालत मी माझा वाढदिवस साजरा केला. ना मी बाहेर गेले ना पार्टी केली. अशी पोस्ट शेअर केली आहे.

 

ही घटना रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे आता संपूर्ण मालिका विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी हिन तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तसेच दख्खनचा राजा ज्योतीबा या मराठी मालिकेत काम केलं होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button