दुःखद! मोटार बंद करायला गेलेली शुभांगी परत आलीच नाही, घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. मोटर बंद करण्यासाठी केलेले शुभांगी नावाच्या मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला. गावामधीलच विहिरीत या मुलीचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश वाडी या गावातील शेतकरी संजय भालेराव यांच्या पत्नी या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांची मुलगी शुभांगी भालेराव ही गावातील विहिरीवर मोटर बंद करण्यासाठी गेली होती. सकाळी ९ वाजता गेलेली शुभांगी अजूनही घरी परतली नव्हती.तिचे वडील ही गावातच ग्रामपंचायत मध्ये गेले होते.
सकाळी 12 वाजेपर्यंत शुभांगी घरी आली नाही त्यामुळे सर्वांचा समज झाला की ती मंचर येथीलच पोलीस अकॅडमी मध्ये ट्रेनिंग साठी गेली असावी. नंतर शुभांगीच्या भावाने तेथील ट्रेनिंग शिक्षकाला विचारले शुभांगी क्लासला आली का तर त्यांनी सांगितले शुभांगी क्लासला अजून तर आज आली नाही. शुभांगी भालेराव ही क्लासला गेली नव्हती मग ती मिळण्याच्या घरी गेली असावी असा विचार सर्वांनी केला. परंतु तिथेही विचारणा केल्यावर तिथेही नाही असे सांगण्यात आले.
त्यानंतर स्वप्निल खंडागळे शुभमचा भाऊ आणि शुभम यांनी विहिरी जवळ पाहिले असता त्यांना काही दिसले नाही. शेवटी त्यांनी विहिरीत गळ टाकला असता त्यांच्या गळाला जड लागले. त्यानंतर त्यांना शुभांगी चे कपडे दिसू लागले. त्यावेळी ग्रामस्थांना बोलावून शुभांगीला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. शुभांगी ला बाहेर काढल्यानंतर तिच्या कानावर मानेवर ओरखडे असल्यासारखे दिसले.
शुभांगी वरती बिबट्याने हल्ला केला असावा असे गावकऱ्यांना वाटले त्यामुळे तिने जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. किंवा शुभांगीला विजेचा धक्का बसला असावा असे सर्वांना वाटू लागले. शुभांगी वरती बिबट्याचा हल्ला झाला असे ग्रामस्थांना वाटू लागल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मी तिचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु वन विभागाने याबाबत काहीच माहिती दिली नसल्याचे सांगितले आहे. शुभांगी चा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका मृत्यू कसा झाला आहे हे कळेल.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यासाठी शुभांगी चा मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत ही घटना कशी घडली आहे हे सांगता येणार नाही. या घटनेचा पोलीस करत असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण गावांमधून हळदी केली जात आहे.