शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

मुंबई | बॉलिवूडचा किंग खान बादशाह अशा अनेक नावाने शाहरुख खानची ओळख आहे. शाहरुख आधी आपल्या मुलाच्या ड्रग्स प्रकरणासाठी चर्चेत होता. आता मात्र तो वेगळ्याच प्रकरणसाठी चर्चेत आला आहे.
शाहरुखला मुंबई येथील इंटरनॅशल एअरपोर्टवर कस्टम विभागानं आडवल आहे. 18 लाखाच्या घड्याळामुळे त्यावरती 6.87 लाख एवढं कस्टम दंड आकारण्यात आला आहे. तसेच त्याच्या कडून हा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
दुबईतील एका कार्यक्रमासाठी शाहरुख खान गेला होता. त्या ठिकाणाहून तो पुन्हा मुंबई एअरपोर्टवर आला. अशावेळी त्याच्या बॅगेत घड्याळाचे कव्हर होते. त्या घड्याळाची किंमत जवळ जवळ 18 लाखांपर्यंत होती. त्यासाठी कस्टम चार्जेस म्हणून 6.87 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
अशावेळी त्यासोबत मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्ड होता. अशावेळी सूत्रांनुसार बॉडीगार्डने कस्टम दंड भरल्याच बोललं जातंय. त्याजवळ शाहरुख खानचे क्रेडिट कार्ड होते. त्यावर त्यांनी चार्जेस भरला. ही माहिती समजल्यानंतर आयुक्त युधवीर यांनी कारवाई केली आहे.
शाहरुख खानल दुबईत एका अवार्डने सन्मानित करण्यात आल होतं. ग्लोबल आयकॉन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आल आहे. एवढच नाही तर सांस्कृतिक योगदानासाठी त्याला हा पुरस्कार मिळाल्याचं म्हटल जातंय. शाहरुख खानचा लवकरच आगामी सिनेमा ‘पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. यामुळे हा सिनेमा कधी येईल याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणाने तो खुपचं चर्चेत आला आहे.