दुःखद! शॉपिंगला गेलेल्या मायलेकी परतल्याच नाहीत, दोघींच्या निधनाने पूर्ण कुटुंब झालं उध्वस्त

पुणे | काळ कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही. आपण कितीही चांगले वागले, मोठी सप्ने पाहिली असतील तरीही जर आपला काळ आला असेल तर त्याला कोणीच रोखू शकत नाही. रस्त्यावर होणारे अपघात हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे ज्यांची काही चूक नाही. ज्यांच्या त्या गोष्टीशी संबंध नाही अशा लोकांनाही आपला जीव विनाकारण गमवावा लागतो. अशाच एका महामार्गावरील अपघातात एका महिलेला आणि तिच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला.
मायलेकी आपल्या स्कुटिवरून जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनाने अचानक धडक दिल्याने त्या दोघीही वाहनाच्या खाली चीरडल्या गेल्या त्यामुळे माय लेकिनी जागेवरच आपला जीव सोडला. वाहनचालकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने घटना झालेल्या ठिकाणावरून लगेच पोबारा केला. मुलगी आणि आई जागेवरच मरण पावल्या होत्या.
त्यांच्या सोबत असलेला मुलगा राहुल हा रस्त्याच्या बाजूला पडल्यामुळे तो जखमी झाला होता. त्याला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्वरित ते घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले. या स्कूटी ला धडक देणाऱ्या वाहनाचा तपास लावण्यास पोलिसांनी सुरू केले होती. स्कूटी वरून जाणारी मुलगी ही स्पर्धा परीक्षाची तयारी करत होती. या मुलीच्या वडिलांचे गेल्याच महिन्यात मृत्यू झाला होता.
नवरा वारल्या नंतर मुलगा आणि मुलीची सांभाळण्याची जबाबदारी ही आईवर येऊन पडली होती. परंतु आता या अपघातात बहीण आणि आई गेल्यामुळे कुटुंबात आता फक्त राहुलचं शिल्लक राहिला होता. बाजारात गेलेले आई योगिनी मुलगी जमिनी आणि राहुल हे घरी येत असतानाच हा अपघात झाला . या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पोलिसांनी तपास सुरू करून अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असून तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.