दुःखद : आधी पतीचे झाले निधन, त्यानंतर काही काळातच पोलीस पत्नीने देखील घेतला जगाचा निरोप

जालना | पोलीस कॉन्स्टेबल पदावर असलेल्या सुनीता ढोबळ यांचा स्कूटी वरून जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये सुनीता यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर जालन्यातील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. सुनिता या भोकरदन या त्यांच्या गावाहून जालना या ठिकाणी निघाल्या होत्या. त्यांची स्कूटी त्यांचाच मुलगा चालवत होता.
दुचाकीला झालेल्या अपघातात सुनीता या जागीच ठार झाल्या तर मुलगा जखमी झाला. सुनिता यांचा पती निधन झाल्यानंतर सुनीता या अनुकंप या मधून त्याच्या पतीच्या जागेवर पोलिसात भरती झाल्या होत्या. त्यांच्या अपघात झाल्यानंतर सुनीता यांचा मृतदेह हा राजुरा मधील हॉस्पिटल मधे घेऊन जाण्यात आले आहे. संक्रातीच्या मुहूर्तावर आपल्या टीममधील सहकार्याचे निधन झाल्याचे समजताच जालन्यातील पोलीस दलाने हळहळ व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार सुनीता ढोबळ या आपल्या मुलांसोबत ड्युटीवर जात असताना त्यांच्या गाडीला आराध्य या मंगलकर्याल्यासमोर अपघात झाला या अपघातात त्यांचं निधन झालं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले.परंतु पोलीस पोहोचे पर्यंत सुनीता यांचं निधन झालं होत. या झालेल्या अपघातामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती.
पोलिसांनी सुनीता यांचा मृतदेह हॉस्पिटल ला पाठवला तसेच मुलालाही उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. २०१७ साली सुनीता या अनुकंपा नुसार पतीच्या जागेवर रुजू झाल्या होत्या. त्याच्या कुटुंबात दोन मुले तसेच एक मुलगी आहे . घरी असलेल्या मुलगी आणि मुलगा याच्यावरील आई गेल्याने दुःखाचा डोंगर पसरला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.