दुःखद! आधी २ मुलांना मारलं त्यानंतर स्वतः केली आत्महत्या; एकाच चितेवर माय लेकरांना द्यावा लागला अग्नी

हैदराबाद : गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्ती वाढली आहे. आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशातच एक तेलंगणा राज्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने स्वतःच्या दोन मुलांना नदीत ढकलून दिले आणि स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळत असते या नदीकिनारी केली आणि होणाऱ्यांच्या मदतीने या तिघांचेही मृतदेह नदीच्या बाहेर काढल.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना निर्मल जिल्ह्यातील बासर शहरात घडली आहे. या घटनेत मृत महिला माणसा वय 27 वर्षे सुरुवातीला तिचा आठ वर्षाचा मुलगा बालादित्य याला नदीत ढकलून दिले. त्यानंतर सात वर्षाची मुलगी नवश्री हिला सुद्धा नदी ढकलून दिले. दोन्ही मुलांना नदीत ढकलून दिल्यानंतर तिने स्वतः उडी मारली.
या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस गोदावरी नदी काठावर आल्यानंतर नदीमधील तिन्ही मृतदेह बाहेर काढले. घाटावरच मुलांचे डबे आणि दप्तरे पडलेली होती. पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणसांचे व्यंकटेश्व र या युवका सोबत लग्न झाले होते. या दांपत्याला मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये होती. व्यंकटेश्वर हे सतत आजारी असत त्यामुळे हे कुटुंब अहमदाबाद येथे आले.
मनसा आणि व्यंकटेश राव हे दोघ मानसाच्या भावाच्या घरी राहत होते. मागील काही दिवसापूर्वी व्यंकटेश्वर चा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनसा आता घर भाड्याने घेऊन दुसरीकडे राहत होती. माणसा ही शॉपिंग मॉल मध्ये कामाला जात होती तर तिची दोन्ही मुले शाळेत जात होती. माणसा तिच्या मुलांना निमितपणे शाळेत पाठवत असत. संदीपला मुल बाळ नव्हते त्यामुळे तो माणसाच्या मुलांवर जीव लावत होता.
नेहमीप्रमाणे माणसाने भावाला सांगितले की मुलांना शाळेत सोडून येते. तिने आपल्या मुलांना घेतले आणि बासर जिल्ह्यातील मंदिरात गेली. त्यानंतर माणसाने मुलांना मंदिरात जेवण नाचे डबे दिले. जेवण खाऊ घातले. आणि त्यांचे चपला शाळेच्या दप्तरावर ठेवल्या. नदी पाहण्यासाठी तिघेही खाली उतरले.
माणसाने त्या दोघा भावाला आणि बहिणीला नदीत ढकलून दिले. नंतर स्वतः नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळत पोलीस त्या ठिकाणी पोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली. पुढील तपास पोलीस करत आहेत तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.