दुःखद! मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे | गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात मृत्यू सोबत झुंज देत असलेले दिग्गज अभिनेते विक्रम गोखले अखेर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खाली वर होत होती. आणि आज अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. रंगभूमी तसेच मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक काळ काम केले. त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी देखील सन्मानित देखील करण्यात आले होते. विक्रम यांच्या निधनाने मराठी अभिनय क्षेत्रात मोठा शोक व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि आज त्यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी व्हायरल झाली होती. त्यावेळी देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला होता. आणि आज देखील त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने एका काळाचा अंत झाल्याचे बोलले जात आहे. विक्रम यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य अभिनयासाठी झोकून दिले होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. असा अभिनेता पुन्हा होणे नाही. असे शब्द सर्वांच्या तोंडून फुटू लागले आहेत.