दुःखद! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारली होती भूमिका

दिल्ली | मनोरंजन विश्वातील गुजराती सिनेसृष्टी ही देखील हिंदी सिनेसृष्टीची बरोबरी करू पाहत आहे. अनेक गुजराती कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर आज जगभर प्रसिद्ध झाले आहेत. अशात आता गुजराती सिनेसृष्टीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीने गुजराती मनोरंजन विश्वात प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. मात्र आता तिच्या निधनाने अनेक चाहते दुःखाच्या हिंदोळ्यात आहेत.

 

काही दिवसांपूर्वीच गुजराती मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाले तेव्हादेखील गुजराती सिनेसृष्टीवर दुःखाची लाट आली होती. रसिक दवे यांना किडनीचा आजार होता. त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते. मात्र किडनीचा हा आजार दिवसेंदिवस वाढत होता. काही दिवस त्यांना डायलिसिसवर देखील ठेवले होते. मात्र दुर्दैवी त्यांचे निधन झाले.

Advertisement

 

त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून गुजराती सिनेसृष्टी सावरत नाही तोच अभिनेत्री हॅपी भावसार यांचे देखील आकस्मित निधन झाले आहे. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी आपला जीवन प्रवास थांबवला आहे. बऱ्याच वर्षांपासून त्या हृदयाच्या कर्करोगाशी लढत होत्या. या लढाईमध्ये त्यांच्या पतीने त्यांना खूप साथ दिली. काही दिवसांपूर्वी उपचार करून त्या घरी देखील परतल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथे त्यांना मृत असल्याचे सांगितले.

Advertisement

 

प्रसिद्ध गुजराती अभिनेते मौलिक नायक यांच्याबरोबर हॅपी यांनी विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून दिले. लग्नानंतर त्यांनी काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कामगिरी केली. मोंटू नी बिट्टू या कार्यक्रमातील त्यांच्या अभिनयासाठी त्या प्रचंड प्रसिद्ध होत्या.

 

त्यांच्या आकस्मित निधनाने आता सोशल मीडियावरती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणाऱ्या व्यक्तींचा पूर आलेला दिसतो आहे. गुजराती भाषिक अनेक व्यक्ती त्यांना सोशल मीडिया मार्फत श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळी देखील शोक व्यक्त करत आहेत. आतापर्यंत हेतल ठक्कर, खुशी शाह, पर्थ ठक्कर अशा अनेक कलाकारांनी हॅपी यांच्या निधनावर सोशल मीडिया मार्फत पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *