दुःखद! प्रसिध्द अभिनेता बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल; थोड्याच दिवसात होणार होत लग्न

दिल्ली | साऊथ चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिध्द अभिनेता चित्रपटाची शूटिंग करत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि यात तो बेशुध्द पडला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्ताच नुकतेच प्रसिध्द अभिनेते आणि महेश बाबूचे वडील कृष्णा यांचे निधन झाले आहे.

Join WhatsApp Group

 

त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. मात्र त्यानंतर ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने साऊथ चित्रपट सृष्टीत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे साऊथ चित्रपट सृष्टीला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. सदर अभिनेत्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

या अभिनेत्याचे नाव नागा शौर्य असे आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तो साऊथ चित्रपट सृष्टीतील एक प्रसिध्द अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या त्याच्या बिघडलेल्या प्रकृती मुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

 

तो NH 24 चे शूटिंग करत होता. मात्र अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर “हाय ग्रेड व्हायरल फिव्हर आणि डिहायड्रेशनमुळे” तो बेशुद्ध पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

येत्या 20 नोव्हेंबर रोजी नागा शौर्य हा त्याची गर्लफ्रेंड अनुषा शेट्टी सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे. मात्र सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र येत्या काही दिवस त्याला आराम करण्याची आवश्यकता असल्याचे देखील बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button