दुःखद! जास्त थंडीमुळे रात्री झोपलेलं पूर्ण कुटुंब सकाळी उठलचं नाही; एकाच घरातील 3 व्यक्तींचे निधन, चिमुकल्याचाही अंत

पुणे | गेल्या दोन ती दिवसात थंडी खूपच वाढली आहे . या थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय लोक करत आहेत. पुण्यातील एका दांपत्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी गॅस हिटर चा वापर केला . पूर्ण रात्र भर गॅस हिटर चालू ठेवणे हे या कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. गॅस हिटर रात्रीच्या वेळी चालूच राहिल्या मुळे या कुटुंबातील सदस्यांच्या श्वास गुदमरून मृत्यु झाला. पुणे शहरातील शिंदे कॉलनीत ही घटना घडलेली आहे.
या कॉलनी मध्ये रविवारी सकाळी दूधवाला दूध वाटण्यासाठी आला होता जाधव याच्या दरवाज्याजवळ बराच वेळ थांबला. त्याला आतून रिस्पॉन्स आला नाही .त्यामुळे त्याने शेजाऱ्यांकडे चौकशी केली. बेल वाजवून आतून कोणीच आले नाही. त्यामुळे ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
३६ वर्षाचे संकेत जाधव हे तेथील कारखान्यात मॅनेजर ची नोकरी करत होते. शनिवारच्या रात्री संकेत त्याची बायको आणि पाच वर्षाचा मुलगा जय हे सगळे झोपायला गेले होते. थंडी खूप असल्यामुळे त्यांनी गॅस हिटर हा चालूच ठेवला होता. त्यांनी झोपण्यागोदर घराची सर्व दारे आणि खिडक्या बंद केल्या होत्या. गॅस हिटर चालू असल्यामुळे त्या तिघांचाही श्वास गुदमरला गेला.आणि रविवारी सकाळ पर्यंत मृत्यू झाला.
दूध वाल्याला घरातून कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्याने शेजाऱ्यांना चौकशी केली. शेजारी गोळा झाल्यानंतर त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिस हे घटना झालेल्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी घराचे दार तोडून काढले. यावेळी जाधव कुटुंबातील सर्वच सदस्य हे बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले परंतु उपचार करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील सर्वच सदस्य हे मृत पावल्याने गावातील लोकांमध्ये शोककळा पसरली.