दुःखद! ‘उठा उठा दिवाळी आली, मोती…’ मधील अलार्म काकांचे निधन; वयाच्या 96व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मुंबई | उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून प्रसिद्ध असलेले विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे.

Join WhatsApp Group

 

विद्याधर करमरकर यांना ‘आबा’ या नावाने देखील सर्वत्र ओळखतात. सुरुवातीला त्यांनी नोकरी करून त्यांची ही अभिनयाची आवड जोपासली होती. त्यांनी मोती साबण, इंडियन ऑईल, पेप्सी गोल्ड, टोमॅटो केचप, लिनोओ कॉम्पुटर यांसारख्या जाहिरातींमध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘दोस्ती यारिया मनमर्जिया’, ‘सास बहु और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक विलन’ या चित्रपटात काम केले होते.

 

उठा उठा दिवाळी आली..! मोती स्नानाची वेळ झाली या जाहिरातीतील अलार्म काका नाही राहिले – उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या जाहिरातीतून ‘अलार्म काका’ म्हणून घरोघरी पोहचलेले आजोबा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ओळखीचा चेहरा झालाय. मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये दिसणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचं 21 सप्टेंबर रोजी निधन झाले.

 

काही जाहिरातींमध्ये देखील दिसले होते करमरकर – विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून आपल्या अभिनयाची आवड जोपासली होती. ते जाहिरात आणि चित्रपटामध्येही अनेक छोट्य़ा छोट्या भूमिकांच्या माध्यमातून अभिनय करायचे. मराठी – हिंदी चित्रपटांबरोबरच ‘इंडियन ऑइल’, ‘पेप्सीगोल्ड’, ‘हेन्ज टोमॅटो केचप’च्या जाहिरातींमध्ये ते झळकले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button