दुःखद! छोटीशी चूक झाली आणि महिलेला कायमचं जग सोडून जावं लागलं; घटना वाचून डोळ्यात पाणी येईल

सोलापूर | घराच्या शेजारी चालू असलेले भांडण सोडवत असताना डोक्याला मार बसून माझ्या पत्नीचा जीव गेला , त्यामुळे मला न्या मिळायला हवा असा आरोप मृत महिलेच्या नवऱ्याने केला आहे. शेजारी नवरा आणि बायकोचे भांडण जोरदार चालू होते. भांडण सोडवायच्या हेतून माझी बायको त्या ठिकाणी गेली होती. त्यावेळी तिच्याच डोक्याला जबर मार बसून ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. अस आरोप करणाऱ्या पतीने पोलिसांना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथे राहणारे संगीता अतिश साळुंखे या शेजारी चालू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेल्या होत्या . त्यामध्ये तिच्या डोक्याला मार बसून मरण पावली. माझ्या बायकोचा विनाकारण बळी गेला ,मला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या पतीने केली आहे.
या घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी तपास चालू केला असून यावर लवकरच आम्ही गुन्हा दाखल करून कारवाई करू अस सांगितलं आहे. १० जानेवारीला मृत महिलेचा पती रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आला होता. ९ तारखेला रात्री उशिरा १० वाजता शेजारी यांच्या नवरा बायकोचे भांडण चालू होते. ते सोडवण्यासाठी संगीता साळुंखे गेल्या होत्या. त्यांच्या या भांडणात संगीताच्या डोक्याला लागले. त्यावेळी त्या बेशुद्ध पडल्या आणि जागेवरच मरण पावल्या.
संगीता साळुंखे या बेशुद्ध पडल्या तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेले.परंतु उपचार करण्यापूर्वीच त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घडलेल्या घटनेत पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली. तसेच अतिश साळुंखे यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.