दुःखद! मन उडू उडू झालं मालिकेतील अजिंक्यवर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबई | मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अवघ्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अवघ्या काही दिवसात या मालिकेने रसिकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आणि ही मालिका टीआरपीच्या बाबतीत काही दिवस अव्वल स्थानी देखील राहिली.
या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत, या मालिकेमुळे तो घरा घरात पोहचला आणि उत्तम अभिनेता म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. टकाटक २ हा चित्रपट त्याचा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
त्यामुळे तो सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता बनला आहे. मात्र सध्या अजिंक्य वर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्याच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.
एकीकडे गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरू होती आणि दुसरी कडे अजिंक्य राऊत च्या आजीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र तरी देखील तो खचून गेला नाही. त्याने हृदयात झालेलं दुःख हे चेहऱ्यावर न आणता गणपती मंडळांना भेटी दिल्या आणि एवढंच नव्हे तर मंडळातील सदस्यां बरोबर त्याने फोटो देखील घेतले आहेत.
त्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून दुःख व्यक्त केलं आहे. पोस्ट लिहिताना तो म्हणाला की मला आजीची शेवटच्या दिवसात खूप सेवा करायची होती. मात्र माझ्या कामामुळे मला जमले नाही. मला माझ्या कामामुळे परिवाराला वेळ देता येत नाही. अशा भाऊक शब्दात त्याने पोस्ट लिहली आहे.