दुःखद! डासाने घेतला गोंडस चिमुकलीचा बळी, वाचून डोळ्यात पाणी येईल

आजकाल आपण निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असतो. निरनिराळे नियोजन करत असतो.घरात जर लहान मुले असतील तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी देखील घेतली जाते. आपल्याला डास चावल्याने वेगवेगळे आजार होतात. त्यासाठी आपण वेवेगले उपाय देखील करत असतो. डास मारायच्या मशीन मुळे एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नागपुरात एका दीड वर्षाच्या मुलीला आपला डास मारायच्या मशीन मुळे जीव गमवावा लागला. नागपूर मधील आशीर्वाद नगर मध्ये ही दुःखद घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या मध्ये मृत पावलेल्या चिमुकल्या मुलीचे नाव रिद्धी दिनेश चौधरी असे आहे. डास चावू नये यासाठी घरामध्ये मशीन लावली होती. रिद्धी ने खेळत असताना या मशीन ला जोडायची लिक्वीड ची बाटली तोंडात घातली. त्यामुळे या लिक्वीड चे विष तिच्या पोटात गेल्याने तिची प्रकृती खराब झाली.
रिद्धी ला तिच्या घरच्यांनी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी घेऊन गेले. परंतु उपचार चालू असतानाच रिद्धी चा मृत्यू झाला. दुपारच्या वेळी रिद्धी ने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे रिद्धीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
आजकाल घरामध्ये डास पासून संरक्षण करण्यासाठी निरनिराळे उपाय योजले जातात. तसेच मशीन वापरले जाते.यातील लिक्वीड हे आपल्यासाठी धोकादायक तसेच विषारी असते. त्यामुळे असे लिक्वीड छोट्या मुलांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. या चिमुकलीच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.