दुःखद! प्रसिध्द अभिनेत्रीच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणाले फार काळ जगणा…

मुंबई | सुख दुःख हे कोणत्याच व्यक्तीला चुकले नाही. श्रीमंत गरीब कोणत्याही स्तरातील लोकांना सामाजिक आर्थिक, शारीरिक समस्या असतात. बऱ्याचदा अशक्य गोष्टीही शक्य होण्याची ताकद जगण्याच्या इच्छा शक्तीत असते. अशीच एका अभिनेत्रीची कथा आहे. गेले अनेक वर्षे झाल तिच्या छातीला छिद्र होते. यामुळे तिनं अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. तिच्या अनेक इच्छा आकांक्षावर मर्यादा आल्याचं समजतंय.

Join WhatsApp Group

 

झलक दिखलाजा सीजन 10 या रियालिटी शोमधील फेम डान्सरवर काळाने घाला घातला, परंतु ती थोडक्यात बचावली आहे. ती आपल्या कामात तत्पर असते. तिनं या शोमध्ये आपल्या आयुष्यात आलेल्या शारीरिक आजाराबाबत खुलासा केला आहे. यामुळे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिला स्पर्धेत मिळालेले कमी गुण यामागील तिनं सत्य उघड केलं आहे.

 

ती दुसरी तिसरी कुणी नसून निती टेलर आहे. ती एवढी मेहनती असूनही तिला आपल्या कामगिरीत प्रामाणिकपणे काम करून देखील कमी गुण का मिळतात याबाबत तिनं भाष्य केलंय. ती म्हणाली की मी लहान असताना माझ्या हृदयाला छिद्र होते. यामुळे याचा मला बऱ्याचदा त्रास झाला आहे. डॉक्टरांनी देखील मी फार काळ जगेल की नाही याबाबत भाष्य केलं नाही.

 

अशावेळी हा सर्व अनुभव सांगितल्यावर सर्वच भावूक झाले होते. ती म्हणाली की डॉक्टरांनी मला विमानात बसण्याची देखील परवानगी दिली नव्हती. माझ्यावर अशी वेळ आली तरीही मी लढवय्य वृती सोडणार नाही. मी लढत राहील. असे तिने या शो मध्ये सांगितले. ती यातून बरी झाली तेव्हा तिन डान्स करायला सुरुवात केली. ती आज एका चांगल्या रियालिटी शोचा भाग बनली आहे. सध्या तिची प्रकृती व्यवस्थीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button