दुःखद! 8 जणांना जीवनदान देऊन 25 वर्षीय क्रिकेट पट्टूने सोडले प्राण; क्रिकेट विश्वात शोककळा

मुंबई | अपघात झाला आणि 25 वर्षीय युवा खेळडूचा ब्रेन डेड झाला. स्वतः अंधकरात गेला आणि त्याने मरता मरता तब्बल 8 व्यक्तींना जीवनदान दिले आहे. त्यामुळे सदर खेळाडू ची पूर्ण देशात प्रशंसा व्यक्त केली जात आहे. सदर खेळाडूचां अपघात झाला. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी सदर तरुणाचा ब्रेन डेड असल्याचे सांगितले. लगेच खेळाडूच्या नातेवाईकांनी अवयव दान करण्यासाठी रुग्णालयाला विनंती केली. त्यानंतर रुग्णालयाने गर्जुवंत रुग्णांशी संपर्क साधला आणि सदर खेळाडूचे तब्बल 8 अवयव दान केले. हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा असे अवयव दान केले आहेत.
त्यामुळे 8 व्यक्तींचे प्राण वाचले आहेत. सदर खेळाडूचे अनमोल जैन असे नाव आहे. तो एक छोटा क्रिकेटर आहे. तो एका कंपनीत काम करत होता. मात्र 17 नोव्हेंबर रोजी त्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा ब्रेन डेड झाला. सदर घटनेने अंतर्गत क्रिकेट विश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
अनेक दिग्गज लोकांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. माञ त्याच्या घरच्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याने जाता जाता 8 व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. अनमोलचे हृदय रुग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात घेऊन जाताना ग्रीन कॉर्डीनेट देखील तयार करण्यात आला होता.