आत्ताच्या घडामोडी

सचिन तेंडुलकर पुन्हा करणार टीम इंडियाचे नेतृत्व; या चषकात पुन्हा झळकणार

मुंबई | साल 2020 मध्ये वर्ल्ड रोड सेफ्टी ही सिरीज सुरू झाली होती. प्रेक्षकांनी याला डोक्यावर उचलून घेतले होते. ही सिरीज प्रचंड गाजली. मात्र कोरोनाचे सावट आल्याने ही लीग बंद झाली. इंडिया लेजंड संघाने या स्पर्धेत जेतेपद पटकावले. लवकरच या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. यामध्ये आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर सध्या या चर्चेला मोठे उधाण आले आहे.

 

या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांशी बातचीत केली असता मोठी अपडेट समोर आली आहे. इंडिया लिजेंड्सचे नेतृत्व यावेळी सचिन तेंडुलकर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज औरंगाबाद, जोधपुर, कटक अशा शहरांमध्ये होणार आहे. हैदराबाद शहरात याचा अंतिम सामना 2 ऑक्टोबर रोजी होईल. तर पहिला सामना हा लखनऊ शहरात 10 सप्टेंबर रोजी घेतला जाणार आहे. कटकमध्ये सहा तर लखनऊमध्ये सात सामने खेळले जाणार आहेत.

 

यासाठी जोधपुर या शहरात दोन हेडर आयोजित करण्यात आले आहेत. तर कटक आणि लखनऊमध्ये प्रत्येकी एक हेडर होणार आहे. रस्ता सुरक्षा बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी अनेक माजी खेळाडू देखील इथे आलेले दिसतील. त्यामुळे यंदाची रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज प्रचंड गाजणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच यामध्ये सचिन तेंडुलकर देखील असल्याने चाहते आणि क्रिकेट प्रेमी ही सिरीज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

 

मागील सामन्यांमध्ये देखील सचिन तेंडुलकर होता. त्यावेळी इंडिया आणि श्रीलंका यांच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला होता. सचिन तेंडुलकर यावेळी नेतृत्व करत होता. यामध्ये सचिन बरोबरच युसुफ पठाण आणि युवराज सिंग यांची देखील दमदार कामगिरी पाहायला मिळाली. सचिन तेंडुलकरने आजवर सर्वच मालिकांमध्ये मोठमोठे विक्रम नोंदवले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र भारतीय संघाला वेळोवेळी त्याच्या मार्गदर्शनाची गरज लागते. आता या सिरीजमुळे पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचे चाहते आनंदी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button