जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री, ती निघाली सचिनची मुलगी

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपटाला मिळालेला एक हिरा, तो म्हणजे सचिन पिळगाकर त्यांनी शेकडो चित्रपटांत काम करून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. सचिन यांच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा घडून गेल्या आहेत की त्या आठवल्यावर चाहत्यांना हसू फुटते.

 

सचिन यांची पत्नी सुप्रिया हे एका कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली, ती ओळख मैत्रीच्या रुपात बदलली, सचिन यांनी सुप्रियाला प्रपोज केलं, मात्र सुप्रिया यांना वाटतं होते की यांचं लग्न झालं आहे.

 

त्यामुळे उत्तर देण्यासाठी त्यांनी खूप कालावधी घेतला आणि हो स्वरूपाचे उत्तर दिले, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. अशी ही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र भूमिका साकारली आहे.

 

त्यानंतर 25 एप्रिल 1989 रोजी त्यांना एक मुलगी झाली, या मुलीचे नाव श्रीया असे ठेवण्यात आले, श्रियाला लहान पणापासून अभिनय करण्याचा छंद होता. तिने सुरुवातील छोट्या पडद्यावर काम केले.

 

त्यानंतर ती हळूहळू प्रकाश झोतात आली आणि तिला बड्या फिल्म कंपन्यांमधून बोलावन येऊ लागलं. त्यानंतर तिने मराठी सोबत हिंदी चित्रपट सृष्टीत देखील पाऊल टाकले. हाथी मेरे साथी, हाऊस अरेस्ट, मिर्झापूर, क्रॅकडाऊन, एकुलती एक अशा दिग्गज चित्रपटात भूमिका साकारली.

 

श्रिया ही सचिन पिळगावकर यांची मुलगी असल्याचे फार कमी लोकांना माहीत आहे. श्रीयाने अभिनय क्षेत्रात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढील काही दिवसांत ती खूप मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button