सचिनची मुलगी सारा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई | मास्टर ब्लास्टर असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार आहे. तिच्या बॉलिवूड देब्यूने ती अनेक स्टार किड्सना तगडी टक्कर देणार आहे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या ती मॉडेलिंग देखील करत आहे.

 

आपल्या मॉडेलिंग मुळे ती नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. सारा दिसायला तशी खूप सुंदर आहे. नुकतेच तिचे मराठमोळ्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ज्याला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळाली. साराने आपल्या करिअरसाठी एक वेगळीच दिशा निवडली आहे.

 

वडील क्रिकेटर आणि आई डॉकटर तरी देखील तिने आपल्या करिअर साठी अभिनय क्षेत्राची निवड केली आहे. सारा सध्या २४ वर्षांची आहे. मीडिया रिपोर्ट नुसार तिने आपलं शालेय शिक्षण हे मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं आहे. तसेच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथून तिने तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.

 

अनेकांचं असं म्हणण आहे की, सारा अभिनय क्षेत्रात येणार नाही. या सर्व अफवा आहेत. कारण ती खूप साधं राहणं पसंत करते. तिचं राहणीमान जरी साधं असलं तरी, तिच्यात अभिनयाचं मोठं कौशल्य आहे. २०२१ पासून तिने मॉडेलिंग सुरू केलं. मॉडेलिंग बरोबरच ती अभिनय देखील उत्तम करते. याचे अनेक नमुने तुम्हाला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती लवकरच बॉलिवूडच्या झगमगीत शामिल होणार आहे.

 

तिने या आधी काही ब्रँड्सचे इंडोर्समेंट देखील करते. तसेच सोशल मीडियावर तिचे १.९ मिलियन फॉलोवर्स देखील आहेत. बॉलिवूडमधील तिच्या एन्ट्रीने बाकीच्या स्टार किड्ससाठी स्पर्धा वाढणार आहे. ज्यामध्ये सुहाना खान, शनाया कपूर आणि खुशी कपूर या स्टार किड्सची नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button