अभिनेत्री उर्वशीच्या गळ्यात रिषभ पंतची चैन…?

ऑस्ट्रेलिया | भारत विरुद्ध पाकिस्तान हा ऐतिहासिक सामना मेलबर्नमध्ये सुरू झाला आहे. टी-20 विश्वचषकातील या सामन्यात भारतीय गोलंदाजांची पहिल्याच काही ओव्हरमध्ये पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान भारत-पाकिस्तानमधील सामना म्हणजे महायुद्धासारखी परिस्थिती असते. सोशल मीडियावर दोन्ही देशातील क्रिकेट रसिकांकडून आपापल्या टीमला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट केल्या जातात. पण आजकाल क्रिकेट संघात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंबरोबरच आणखी एक नाव कोणत्याही सामन्याआधी चर्चेत येते. आजही ते नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला होय.

Join WhatsApp Group

 

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका ब्रँडचं प्रमोशन करताना दिसतेय. ऑफ शोल्डर ड्रेसवर तिने गळ्यात सिल्वर आणि डायमंडची चेन घातली आहे. उर्वशीच्या गळ्यातील ही साखळी हुबेहूब ऋषभच्या गळ्यातील साखळीसारखी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.ऋषभने नंतर डेटिंगच्या चर्चा नाकारल्या होत्या.

 

उर्वशी-ऋषभ पंतचा वाद:
ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळायला पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button