आत्ताच्या घडामोडी

सैराट मधील आर्चीची आई पाहिली का? दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

सोलापूर | मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट आले आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले. तसेच अनेक चित्रपटांनी तर गल्ल्याच्या बाबतीत मागील सर्व रेकॉर्ड तोडले. मात्र सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि इतिहासात नोंद झाली.

 

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटाने 100 कोटीहून अधिक कमाई केली. यापूर्वी काही चित्रपट 50 कोटींची कमाई करून बसले होते. मात्र सैराट चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडली आहेत.

 

त्यात काम करणाऱ्या सर्व कलाकार वर्गाना एक वेगळी ओळख या चित्रपटाने दिली आहे. यात मुख्य भूमिकेत रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची दिसली होती. तसेच परशा या पात्राची भूमिका आकाश ठोसर याने साकारली होती.

 

या दोघांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने त्यातील सर्व कलाकारांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे. आज आम्ही तुम्हाला चित्रपटातील आर्ची म्हणजेच रींकुच्या खासगी आयुष्यातील काही माहिती देणार आहोत.

 

रिंकू सध्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसापासून तिचे साडी मधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भलतीच चर्चेत आली होती.

 

आज आम्ही तुम्हाला रिंकूच्या आई बद्दल माहिती सांगणार आहे. रिंकूच्या आईचे नाव आशा असे आहे. आशा या मूळच्या अकलूज येथील, त्यांचं माहेरचं आडनाव हेळकर असे आहे. आशा या देखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

 

त्यांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स आहेत. त्या Instagram वर सक्रिय दिसतात. सध्या त्या शिक्षिका म्हणून काम पाहतात. त्यांचे पती देखील एक शिक्षक आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button